Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

शांतता

कालची शांतता समुद्राच्या हलक्या लाटेसारखी होती
पण आजची शांतता काखेत त्सुनामी घेऊन येतीये

कालची शांतता गुलाबाच्या पाकळ्यांसारखी होती
पण आजची शांतता देठावरच्या काट्यासारखी बोचतीये

कालची शांतता उबदार रजई सारखी होती
पण आजची शांतता ठिगळं पडलेल्या गोधडी सारखिये

कालची शांतता गवती चहा सारखी होती
पण आजची शांतता आजारपणातल्या औषधी काढ्यासारखीये

कालची शांतता मला वेडा म्हणणारी होती
पण आजची शांतता मला वेडा ठरवणारीये

कालची शांतता सचिनच्या शतकाचा आनंद देणारी होती
पण आजची शांतता त्याच्याच निवृत्तीच्या घोषणेसारखीये

– शुभम् कुलकर्णी

17 Comments on “शांतता

Leave a Comment